Satish Bhosale : खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
सतीश उर्फ खोक्या भोसले याची रवानगी आता बीड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याआधी त्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेलं होतं.
सतीश उर्फ खोक्या भोसलेची रवानगी आता बीड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. यापूर्वी त्याला शिरूर कासार येथील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेलं होतं. याठिकाणच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर आता खोक्याची रवानगी आज बीड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शिरूर कासार येथील मारहाण प्रकरणात खोक्या उर्फ सतीश भोसले हा आरोपी आहे. तसंच आमदार सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता आहे. त्याचे इतरही काही पैशांचे व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला न्यायालयाने 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान त्याला शिरूर कासार येथील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेलं होतं. मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याला बीड शहर पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं आहे.
Published on: Mar 18, 2025 02:42 PM