बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीवर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

| Updated on: Feb 07, 2023 | 2:46 PM

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय. या सगळ्या राजकीय घडामोडींवर आमदार सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ते काय म्हणाले आहेत....

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद आता विकोपाला गेलाय. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय. या सगळ्या राजकीय घडामोडींवर आमदार सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कुठलाही संपर्क झालेला नाही. बाळासाहेब थोरातसाहेबांनी जर पत्र लिहिलं असेल तर 100 वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या परिवारावर ही वेळ का येत आहे? यावर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं सत्यजित तांबे म्हणाले. काँग्रेसमध्ये गट वगैरे असतील असं मला वाटत नाही. मला जे बोलायचं होतं ते मी पत्रकार परिषदेत सविस्तर मुद्दे घेऊन बोललो आहे. मी माझी भूमिका पुराव्यानिशी मांडली आहे. त्यामुळे मला आता त्यावर काही बोलायचं नाही, असंही सत्यजित तांबे म्हणालेत.

सर्वात मोठी बातमी : आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निहार ठाकरे मैदानात उतरवण्याची शिंदेगटाची तयारी
अदानी आणि नरेंद्र मोदींचे फोटो दाखवत राहुल गांधींनी विचारलं, ये रिश्ता क्या कहलाता है?