पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान, सत्यजित तांबे यांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले…

| Updated on: Jan 30, 2023 | 2:53 PM

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. यावेळी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. यावेळी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांनी प्रतिसाद दिला. त्यांच्या ऋणात राहने पसंत करेल. विजय झालाच आहे. आता फक्त किती लिड मिळत त्याकडे लक्ष आहे. लोक पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जावून काम करत आहे याचा आनंद आहे, असं सत्यजीत म्हणालेत. मी अपक्ष उमेदवार अपक्षच राहील. अर्धसत्य ठेवून बाजू मांडली. त्रास झाला मात्र वेळ आली की बोलणार. काँग्रेसकडून झालेला अन्याय मान्य नाही, असं सत्यजित म्हणालेत.

Published on: Jan 30, 2023 02:53 PM
तर सर्वोच्च न्यायालयात जाणार, तिथेही आमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत : विनायक राऊत
एकनाथ शिंदे यांचे एमआयएमसोबत पूर्वीपासून संबंध- चंद्रकांत खैरे