तरूणाईचे प्रश्न अन् त्यावरचा उपाय, ऐका सत्यजीत तांबे काय म्हणाले?

| Updated on: Jan 25, 2023 | 8:12 AM

सत्यजीत तांबे यांनी एका कार्यक्रमात तरुणाईशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तरूणाईच्या समस्या आणि त्यावरचा उपायही त्यांनी सांगितला. पाहा ते काय म्हणालेत...

सत्यजीत तांबे यांनी एका कार्यक्रमात तरुणाईशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तरूणाईच्या समस्या आणि त्यावरचा उपायही त्यांनी सांगितला. “आजकाल तरूण चांगलं शिक्षण घेतात. डॉक्टर इंजिनिअर होतात. पण या शिक्षणानंतर नोकरीसाठी जर या तरूणांना दुसऱ्या शहरात जावं लागत असेल तर ते योग्य नाही. आधीच मिळणारा तुटपुंजा पगार अन् त्यामुळे या मुलांचे हाल होतात. घरापासून दूर राहावं लागतं. दुसऱ्या शहरात राहण्यासाठी अव्वाच्या सव्वा खर्च येतो. या सगळ्यात जर बदल करायचा असेल तर आपल्याला चांगल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे”, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलंय.

Published on: Jan 25, 2023 08:12 AM
ऐकावं ते नवलंच! श्वानांचा विधीवत विवाह संपन्न, कुठं घडली ‘श्वानांच्या लग्नाची गोष्ट’
Pathaan Movie : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना नोटीस, काय आहे कारण?