गेला सत्यजित कुणीकडे? तांबे अज्ञात स्थळी रवाना, नाशकात नाट्यमय घडामोडी

| Updated on: Feb 02, 2023 | 10:40 AM

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रमुख उमेदवार सत्यजित तांबे कालपासून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या सर्व घडामोडींकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील आपल्या विजयचा दावा करत आहेत. मात्र, या निवडणुकीत प्रमुख दावेदार सत्यजित तांबे अज्ञात स्थळी रवाना झाल्यामुळे नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

अगदी मतमोजणीच्या दिवशी तांबे पिता-पुत्रांच्या हालचालीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. तांबे कुटुंबियांकडे तसेच कार्यकर्त्यांकडे सत्यजित तांबे यांची चौकशी केली असता ते अज्ञात स्थळी गेल्याचे सांगण्यात आले. मतमोजणीच्या अगदी ऐनवेळी सत्यजित तांबे समोर येतील अशी माहितीही देण्यात आलीय. तुमची नेमकी भूमिका काय, असा सवाल डॉ. सुधीर तांबे यांना केला असता त्यांनी योग्य वेळ भूमिका स्पष्ट करू, अशीच प्रतिक्रिया दिली.

Published on: Feb 02, 2023 10:40 AM
‘जीत’ सत्याची, विजय नव्या पर्वाचा!; निकालाआधीच सत्यजित तांबे यांच्या अभिनंदनाचे पोस्टर
माहेरच्या लोकांनी भरघोस मतदान केलंय; विजय माझाच शुभांगी पाटील यांचा दावा