आजपासून शाळेला सुरुवात, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
आजपासून शाळेला सुरुवात झाली आहे. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
आजपासून शाळेला सुरुवात झाली आहे. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक दिवसांनंतर शाळेत जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत करताना दिसून येत आहेत. पुण्याच्या भावे स्कुलमध्ये चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना सोडण्यासाठी पालक देखील शाळेत आले आहेत.