इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर खालापुरात कलम 144 लागू; काय कारण?

| Updated on: Jul 23, 2023 | 2:14 PM

त्याचबरोबर बचावकार्यासाठी आणखीन 4 तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. यादरम्यान आता पावसामुळे बचावकार्याला वेग येताना दिसत नाही. त्याचच आता मृतप्राण्यांची दुर्गंधी सुटू लागली आहे.

मुंबई, 23 जुलै 2023 | रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही येथे मदत आणि बाचवकार्य सुरू आहे. त्याचबरोबर बचावकार्यासाठी आणखीन 4 तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. यादरम्यान आता पावसामुळे बचावकार्याला वेग येताना दिसत नाही. त्याचच आता मृतप्राण्यांची दुर्गंधी सुटू लागली आहे. त्याचवेळी, इर्शाळवाडीवर मदतीसाठी येणारे ट्रेकर्स, सामाजिक कार्यकर्त्यांची गर्दीही वाढताना दिसत आहे. तर अनेकजण निव्वळ कुतूहलापोटी येथे जाऊन गर्दी करत आहेत. ज्यामुळे येथे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाकडून यावर कडक पावले उचलली जात आहेत. तर मदतकार्यात नेमलेल्या व्यक्तींशिवाय इतरांना गडावर जाण्यास रविवारपासून पुढील पंधरा दिवस बंदी घालण्यात आली असून येथे कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Published on: Jul 23, 2023 11:22 AM
जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस; एकाच दिवशी सर्वात जास्त पावसाची नोंद!
अर्थमंत्री होताच अजितदादा अ‍ॅक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादीच्या आमदारांवर केला निधीवर्षांव!