भाजप नेत्याच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली, उद्धव ठाकरे यांच्यावर केलं होतं वादग्रस्त विधान
भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. सातत्याने प्रसाद लाड उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याने ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मुंबई : भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. सातत्याने प्रसाद लाड उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याने ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लाड यांच्या सायन इथल्या कार्यालयाबाहेर सध्या पोलीस सुरक्षा वाढलीय. लाड यांच्या कार्यालयावर ठाकरे गटाकडून हल्ल्याच्या शक्यतेनं ही सुरक्षा वाढवण्यत आली आहे. वर्धापन दिनानिमित्त काल सायन परिसरात ठाकरे आणि शिंदे गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात वाद चिघळण्याची शक्यता असल्यामुळे ही सुरक्षा वाढवण्यात आलीआहे.
Published on: Jun 20, 2023 01:21 PM