ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड; दीर्घ आराजाने झालं निधन
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले. त्यांनी 81 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. तर त्यांचे निधन हे दीर्घ आराजाने झालं आहे.
मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : अभिनेता अजिंक्य देव याला पुन्हा एकदा अतंत्य दुखाला सामोरं जावं लागत आहे. गेल्या एक वर्षांच्या आधी अजिंक्य देवला पितृशोक झाला होता. तर आता त्याला मातृशोक झाला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं यांचे दीर्घ आराजाने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सीमा देव यांनी मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला होता. तर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांना अल्जायमरचा त्रास होता.
याच्याआधी 2022 मध्ये रमेश देव यांचं निधन झालं होतं. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची प्राणज्योत मावळली होती.
Published on: Aug 24, 2023 02:34 PM