Sudhir Mungantiwar : अनंत चतुर्थीपूर्वीच पालकमंत्र्यांची निवड अन् दिवाळीपू्र्वी मंत्रिमंडळाचा विस्तार
जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे पण मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तर उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार हा दिवाळीपूर्वीच होणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. सध्या 20 मंत्री हे राज्याची सेवा करीत आहेत. आगामी काळात उर्वरित विस्तार करुन जनतेची सेवा हा जो सरकारचा संकल्प आहे तो देखील पूर्ण केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबई : उर्वरित (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाचा विस्तार कधी..? यावरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करीत आहे. याबाबत मंत्री (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अनंत चतुर्थाच्या आगोदर प्रत्येक जिल्ह्याला हा पालकमंत्री दिला जाणार आहे. त्यामुळे विरोधकांनी काही काळजी करण्याची गरज नाही. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी (State Government) राज्य सरकार तत्पर आहे पण मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तर उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार हा दिवाळीपूर्वीच होणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. सध्या 20 मंत्री हे राज्याची सेवा करीत आहेत. आगामी काळात उर्वरित विस्तार करुन जनतेची सेवा हा जो सरकारचा संकल्प आहे तो देखील पूर्ण केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम मोदींचे कौतुक हे गुजरातचा विकास पाहून केले होते. मध्यंतरी लोकसभा निवडणूकीत ते दुरावले असले तरी आमची मैत्री कमी झाली नसल्याचेही त्यांनी सांगून युतीबाबत अनुकूल वातावरण असल्याची एक प्रकारे पुष्टीच दिली आहे. पण युती होताना स्थानिक संघटनेला विचारात घेतले जाते असेही ते म्हणाले आहेत.