Late RamLaxman | ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांचं निधन
नागपुरचे सुपूत्र आणि संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील संगीतकार लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे नागपूर येथे मुलाकडे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सूना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे. राम कदम उपाख्य राम व विजय पाटील उपाख्य लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण ही जोडी होती. राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट. १९७६ साली आपले जोडीदार राम यांच्या मृत्यू नंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले.