Eknath Khadse यांचा Dilip Walse Patil यांना टोला
वळसे पाटलांना अनेकदा सांगतो, की गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका, दाखवा एकदा इंगा, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. शेकडो प्रकरणं यांची आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वीच टाकून दिलं असतं, तर ही परिस्थिती आली नसती, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.
जळगाव : जळगावात शरद पवारांच्या (Sharad Pawar in Jalgaon) दौऱ्यादरम्यान एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राज्यात सुरु असलेल्या वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया, भाजपकडून सुरु असलेलं राजकारण, या सगळ्यावर एकनाथ खडसेंनी निशाणा साधला. राज्यात सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप यावेळी खडसेंनी भाजपवर केला. दरम्यान, यावेळी खडसेंनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांना दिलेला सल्लाही चर्चेचा विषय ठरतोय. वळसे पाटलांना अनेकदा सांगतो, की गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका, दाखवा एकदा इंगा, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. शेकडो प्रकरणं यांची आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वीच टाकून दिलं असतं, तर ही परिस्थिती आली नसती, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी सरकारलाही याबाबत विनंती करणार असल्याचं म्हटलंय.