Account Allocation | औरंगाबादच्या पालकमंत्रीपदासाठी अजूनही रस्सीखेच कायम-tv9
औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून अतुल सावे, अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्यात स्पर्धा पहायला मिळत आहे. सुरू असणारे पावसाळी अधिवेशन संपताच विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्याचे अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्रीवरून आता शिंदे गटातील आमदारांच्यामध्ये आणि मंत्र्यांमध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे. अशीच रस्सीखेच औरंगाबाद पहायला मिळत आहे. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरून अतुल सावे, अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्यात स्पर्धा पहायला मिळत आहे. सुरू असणारे पावसाळी अधिवेशन संपताच विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच औरंगाबादचे पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावे म्हणून औरंगाबादचे नेत्यांचे वरिष्ठांकडे लॉगिन सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.