राऊत यांचे फडणवीस-ठाकरे भेटीवर स्पष्टीकरण, म्हणाले…एकच रस्ता
कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दिली
नाशिक : राज्याच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला हजेरी लावली. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांनी एकाच वेळी विधानभवनात एकत्र प्रवेश केला. प्रदीर्घ कालावधीनंतर आज दोन्ही नेते विधानसभेत एकत्र दिसले. यादरम्यान दोन्ही नेते एकमेकांशी हसताना आणि बोलतानाही दिसले.
यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा हातमिळवणी करणार का? त्यातच कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, ‘उद्धवजी पुन्हा एकदा विचार करा’. यावरू खासदार संजय राऊत यांनी, या प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आता दोघांसाठी वेगळा रस्ता निर्माण करता आला तर बघू. रस्ता एकच आहे ना विधानसभेत जाण्याचा, विधिमंडळात जाण्याचा, त्याच्यामुळे या चर्चा आणि अफवा त्याच्यामध्ये काही अर्थ नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.