Bharat Gogawale On Aaditya Thackeray | भरत गोगावले यांचा ठाकरेंना इशारा – tv9
आमच्या नादाला लागू नका असा असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. तर तुम्हाला आवडीच वर्षात ते जमलं नाही ते आम्ही महिनाभरात केलं असा टोलाही गोगावले यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
राज्याचे अधिवेशन संपले आहे. तर अधिवेशनातील घोषणांमुळे अनेक चेहरे हे आता समोर आले आहेत. तर आता त्याच घोषणांवरून शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. यावेळी आमच्या नादाला लागू नका असा असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. तर तुम्हाला आवडीच वर्षात ते जमलं नाही ते आम्ही महिनाभरात केलं असा टोलाही गोगावले यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंची दिशा चुकली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती नको असा त्याचा अर्थ होतो असेही आमदार गोगावले यांनी म्हटलं आहे. तर सामनातून होत असलेल्या टीकेला उत्तर हे मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच दिल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तर कंत्राटी माणूस हा नंतर परमनंट होतो. 240 दिवस भरल्यानंतर तो परमनंट होतो हा शासनाचा नियम असतो असेही ते म्हणाले.