फडणवीस-ठाकरे भेटीवर प्रविण दरेकर यांनी दिले संकेत…

| Updated on: Mar 24, 2023 | 1:36 PM

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा हातमिळवणी करणार का? अशी चर्चा होताना दिसत आहे. यावरून भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

मुंबई : राज्याच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रच अधिवेशनाला आले. विधानभवनात दोघे एकत्र प्रवेश करताना दोन्ही नेते एकमेकांशी हसताना आणि बोलतानाही दिसले. यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा हातमिळवणी करणार का? अशी चर्चा होताना दिसत आहे. यावरून भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

भविष्यामध्ये दोन्ही पक्षाचे एकत्र येतील की आता चर्चेचे रस्ते बंद झाले या प्रश्नावर दरेकर यांनी, हा आपल्या पातळीवरचा विषय नाही. पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. त्या ठिकाणी आपण निश्चित भूमिका नाही सांगू शकत असेही दरेकर यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 24, 2023 01:36 PM
…पण त्यांचे पाय खाली थरथरत होते; राऊतांची शिवसेनेच्या नेत्यावर टीका
खोके, मिंधे अन् गद्दार बोलणं कुठल्या कायद्यात बसतं?, सभागृहात मुख्यमंत्री म्हणाले…