Video | शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे काम पूर्ण, कसा आहे देशातला सर्वात मोठा सागरी महामार्ग?

| Updated on: Jan 06, 2024 | 12:59 PM

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक ( MTHL ) अर्थात अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा सागरी सेतूचे काम पूर्ण झाले आहे. या सागरी महामार्गाचे उद्घाटन येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या मार्गामुळे मुंबई ते नवीमुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांवर येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सागरी सेतूचा आज दौराकरून पाहणी केली आहे.

मुंबई | 6 जानेवारी 2023 : महत्वाकांक्षी मुंबई ट्रान्सहार्बर लिंक ( MTHL ) प्रकल्प अर्थात अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या 12 जानेवारीला या सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सागरी सेतूसाठी प्रवाशांना सुरुवातीला 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई हे बेट नवीमुंबईशी जोडले जाणार आहे. तसेच मुंबई ते नवीमुंबई, रायगड आणि इतर शहरात अवघ्या 20 मिनिटात जाता येणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू शिवडी येथून सुरु होत समुद्र मार्गे चिरले गावी म्हणजे न्हावा शेवा ( जेएनपीटी बंदर ) पर्यंत जातो. तेथून हा मार्ग मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे ला जोडला जाणार आहे. एकूण  22 किमीच्या या मार्गाचा 16.80 किमीचा रस्ता समुद्रातून जात असल्याने हा भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू ठरला आहे. तर जगातील हा 12 व्या क्रमांकाचा सागरी सेतू ठरला आहे. 18 हजार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या महामार्गाचे काम कोरोनाकाळ असूनही वेगाने पूर्ण झाले आहे. या मार्गाला पुढे शिवडी ते वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडले जाणार आहे.

Published on: Jan 06, 2024 12:57 PM
MV Lila Norfolk जहाज हायजॅकचा प्रयत्न फसला, भारतीय नौदलाकडून कारवाईचा व्हिडीओ शेअर
तुमच्याकडे येण्यापूर्वी ज्यांच्यावर आरोप होते ? त्यांच्यावरील कारवाईचे काय? रोहित पवार यांचा ईडी कारवाईवर भाजपाला सवाल