“खोड्या बंद करा, असली दादागिरी चालणार नाही!”, शहाजीबापू पाटलांचा अधिकाऱ्याला फोन

| Updated on: Aug 28, 2022 | 8:36 AM

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्याला एक फोन केला. तो सध्या चर्चेत आला आहे.

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) त्यांच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची बोलण्याची स्टाईल चर्चेचा विषय ठरते. शिंदे गटाच्या बंडावेळी काय झाडी काय डोंगर काय हाटील असं म्हणत त्यांनी गुवाहाटीच्या निसर्गाचं वर्णन केलं होतं. त्यांचं ते कॉल रेकॉर्डिंग चर्चेचा विषय ठरलेलं. आता त्यांनी अधिकाऱ्याला एक फोन केला. तो सध्या चर्चेत आला आहे. सोलापूरच्या उजनी धरणातील (Ujani Dam) पाण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला फोन केला अन् त्याला खडसावलं. “खोड्या बंद करा. असल्या खोड्या चालणार नाहीत. असली दादागिरी इथं चालणार नाही!”, असं म्हणत शहाजीबापूंनी अधिकाऱ्याला खडसावलं. यावेळी ग्रामस्थ त्यांच्यासमोर उपस्थित होते.

Published on: Aug 28, 2022 08:34 AM
Special report : संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या शिंदे गटाची चिंता वाढवणाऱ्या?
“विद्याताई, जय श्रीराम”, मोहित कंबोज ट्विटमधून काय सुचवू पाहताहेत?