शहाजीबापू पाटील यांच्याकडून जयंत पाटील यांचे चरणस्पर्श, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Jun 02, 2023 | 8:05 AM

शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करतात. राष्ट्रवादीमुळे निधी मिळत नसल्याने बंडखोरी केल्याचंही शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत. पण सोलापुरात एका लग्नानिमित्त वेगळंच दृश्य समोर आलं आहे. शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे पाय धरत आशीर्वाद घेतले .

सोलापूर: शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करतात. राष्ट्रवादीमुळे निधी मिळत नसल्याने बंडखोरी केल्याचंही शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत. पण सोलापुरात एका लग्नानिमित्त वेगळंच दृश्य समोर आलं आहे. शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे पाय धरत आशीर्वाद घेतले . काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त जयंत पाटील आणि शहाजी बापू पाटील यांची भेट झाली. यावेळी जयंत पाटील दिसताच आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांचे चरण स्पर्श करून विचारपूस केली. या लग्न सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, जयंत पाटील, शहाजीबापू पाटील यांसह अनेक नेते उपस्थित होते.

 

Published on: Jun 02, 2023 08:05 AM
Special Report | पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेणार? मनात नेमकी खदखद काय?
Special Report | संजय शिरसाट यांच्या क्लीनचिटवर सुषमा अंधारे यांचा सवाल