अजितदादांना अर्थ खातं अन् शहाजीबापू पाटील नाराज? म्हणाले,”आमदारांमध्ये अस्वस्थता…”

| Updated on: Jul 17, 2023 | 7:43 AM

शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर शिंदे गटाने सुरतमार्गे गुवाहाटी ते गोवा असा प्रवास केला. यावेळी काय झाडी काय डोंगर यांनी डायलॉगने प्रसिद्ध झालेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर संताप व्यक्त केला होता. मात्र आज अजित पवार सत्तेत आल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी यूटर्न घेतल्याचं दिसत आहे.

मुंबई, 17 जुलै 2023 | शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर शिंदे गटाने सुरतमार्गे गुवाहाटी ते गोवा असा प्रवास केला. यावेळी काय झाडी काय डोंगर यांनी डायलॉगने प्रसिद्ध झालेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर संताप व्यक्त केला होता. मात्र आज अजित पवार सत्तेत आल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी यूटर्न घेतल्याचं दिसत आहे. “अजित दादांकडे अर्थ खातं गेल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थतता आहे, हे प्रसारमाध्यमांच मत आहे. शिवसेनेतील शिंदे गटाच्या आमदारांचे नाही. निधी वाटपाचे नियोजन निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब आणि अजित दादा योग्य पद्धतीने करतील असा विश्वास आहे. त्यामुळे भीती वाटत नाही,” असं शहाजी बापू पाटील म्हणाले.

Published on: Jul 17, 2023 07:43 AM
ठाकरे गटाचा मोठा निर्णय, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अन् बजोरिया यांना अपात्र करा; विधीमंडळ सचिवांना लिहिलं पत्र
पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री शिंदे यांची खाती इतर मंत्र्यांकडे; नेमकं असं काय होतयं?