निवडणूक आयोगाला मॅनेज केल्याचा संजय राऊतांचा आरोप, शहाजीबापू पाटलांचा जोरदार पलटवार; म्हणाले…
खासदार संजय राऊत यांनी शिंदेगटावर गंभीर आरोप केलेत. त्यावर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
पंढरपूर : शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटींची डील झाली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. त्यावर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. “केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. त्यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे. संजय राऊत यांची मानसिकता बिघडली आहे. संजय राऊत लोकशाही आणि समाजाची मानसिकता बिघडवण्याचं महापाप करत आहेत. हे महाराष्ट्राला शोभणार नाही. संजय राऊत नागापेक्षाही विषारी विष तोंडातून बाहेर काढत आहेत. मात्र त्यांच्या या विधानाला महाराष्ट्रातील जनता भिक घालणार नाही., असं शहाजीबापू पाटील म्हणालेत.
Published on: Feb 19, 2023 12:26 PM