उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढणार? 6 ते 7 आमदार शिंदे गटात जाणार, ‘या’ मंत्र्याचा मोठा दावा

| Updated on: Jul 17, 2023 | 9:23 AM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आल्यापासून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या 16 ते 17 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सोलापूर, 17 जुलै 2023 | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आल्यापासून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या 16 ते 17 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, “संजय राऊत ज्याच्या बाजूने बोलतात त्यांचं वाटोळ होतं. आमच्यातील एकही आमदार कुठे जाणार नाही. उलट उद्धव साहेबांकडे असलेल्या 16 आमदारांपैकी सात ते आठ आमदार लवकरच शिंदे गटात येणार आहे. राजकारणात वादळ निर्माण करण्यासाठी आरोप केले जातात. असेच आरोप राष्ट्रवादीने खोक्यावरून आमच्यावर केले होते. कोण कोणाला देत नसतं आणि कोणी घेत नसते. हे त्यावेळेसही राष्ट्रवादीला पटलं होतं आणि आजही पटतंय.”

Published on: Jul 17, 2023 09:23 AM
ठाकरे गटाचा मोठा निर्णय, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अन् बजोरिया यांना अपात्र करा; विधीमंडळ सचिवांना लिहिलं पत्र
धक्कादायक! रोहित पवार यांच्या पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न