“पुढच्या वर्षीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच पूजा करतील”, शिवसेनेच्या आमदाराची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 29, 2023 | 8:41 AM

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. आषाढी एकादशनिमित्ती दादा भुसे, शहाजीबापू पाटील, राधाकृष्ण विखे पाटील पंढरपुरात दाखल झाले. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी "पुढच्या वर्षीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पूजा करतील," असं वक्तव्य केलं.

सोलापूर – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. आषाढी एकादशनिमित्ती दादा भुसे, शहाजीबापू पाटील, राधाकृष्ण विखे पाटील पंढरपुरात दाखल झाले. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी “पुढच्या वर्षीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पूजा करतील,” असं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “पुढच्या वर्षीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं विठ्ठलाची पूजा करतील. उपमुख्यमंत्री हे कार्तिकी एकादशीला पूजा करतात. सह्याद्रीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. पण अवर्षणग्रस्त भागात पाऊस सुरू झालेला नाही.माझं विठ्ठलाकडे साकडं आहे की दुष्काळग्रस्त भागात पाऊस पडूदे.तसेच विरोधकांना माझं एकच सांगण आहे की, शांत राहावं कडकड करू नये.”

Published on: Jun 29, 2023 08:41 AM
“राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून अहमदनगरमध्ये दंगली वाढल्या”, मनसेचा गंभीर आरोप
महाराष्ट्रभरात पावसाची जोरदार बॅटिंग, कुठे भुस्खलन, तर कुठे साचलं पाणी, पाहा स्पेशल रिपोर्ट…