Shahajibapu Patil : ‘ठाणे का टायगर, आखो मे अंगार..’; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंनी गायलं गाणं
Shahajibapu Patil Song : कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबन गाण्यानंतर आज शहाजीबापू पाटील यांनी शिंदेंच्या समर्थनार्थ गाणं तयार केलं आहे.
‘ठाणे का टायगर, आखो मे अंगार..’, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापू पाटलांनी गाणं रचलं आहे. कॉमेडीयन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बनवलेल्या वादग्रस्त गाण्यानंतर सुरू झालेला वाद अद्याप सुरूच असून शिवसेना शिंदे गटाकडून कुणाल कामरा याच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. आता शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गाणं तयार केलं आहे.
‘ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. उबाठाको खत्म करने महाराष्ट्र के मैदान मे आया.. मातोश्री के आंगन मे कामरा आया, सुपारी लेके गाना गया.. उद्धवजी को खुशी आया .. असं गाणं शहाजीबापू पाटील यांनी म्हंटलं आहे. तसंच कुणाल कामरा याच्यावर सांगोल्यात गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी म्हंटलं आहे.
Published on: Mar 30, 2025 03:07 PM