‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर…’ म्हणाणाऱ्या आमदाराचा अजित पवार गटात प्रवेश
याच्याआधी दरोडा यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला होता. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर आपण त्या सरकारसोबत जाणार नाही अशी भूमिका आ. दरोडा यांनी घेतली होती.
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी फारकत घेत वेगळी चूल मांडली. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रावादीतील अनेक आमदार गेले. आताही शरद पवार गटाला हादरे बसतच आहेत. काहीच दिवसांच्याआधी नाशिकमध्ये शरद पवार गटाला एक धक्का लागला होता. ज्यात तटस्थ राहणाऱ्या नाशिकमधील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर आता शहापूर राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच शरद पवार गटाला आपला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तर त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. याच्याआधी दरोडा यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला होता. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर आपण त्या सरकारसोबत जाणार नाही अशी भूमिका आ. दरोडा यांनी घेतली होती. मात्र आता शरद पवार यांची साथ सोडत दरोडा हे अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत.