आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक

| Updated on: Oct 17, 2024 | 5:49 PM

विकासाच्या मुद्द्यावर सांगोल्याची निवडणूक होणार आहे.सांगोल्यातील टेंभू म्हैसाळ या पाण्याच्या योजनांना आपण निधी आणला, 5000 कोटींचा निधी आणून चौफेर विकास केल्याने शेकापचे आपल्याला कसलेही आव्हान नसल्याचेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.

Follow us on

राज्यात विधानसभा निवडणूकांची घोषणा झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे. परंतू महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन घोळ मिटता मिटेना झाला आहे.जादा जागा लढवल्या तर जादा जागा जिंकण्याची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर दावा सांगता येणार आहे. त्यामुळे जादा जागा मिळावी अशी प्रत्येक पक्षाची मागणी आहे. एकनाथ शिंदे यांना शांत करण्यासाठी अमित शाह यांनी आमच्या 105 जागा असतानाही आम्ही मुख्यमंत्री पदाचा त्याग केला, आता तुम्ही त्याग करा असा सल्ला शिंदे यांना दिल्याचे म्हटल्याने दोन्ही पक्षात टेन्शन आहे. यावर मुख्यमंत्री पदाचा भारतीय जनता पार्टीने त्याग केला ही एक बाजू असली तरी आम्ही देखील आमच्या आमदारकी, मंत्री पदे धोक्यात घालून सत्तांतर घडवले, त्यामुळे भाजपा सत्तेत आल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतल्याचे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी आमच्या शिवसैनिकांची भावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीत विरोध पक्ष नेता कोण होणार यावरुन मतभेद होऊन फूट पडणार असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले आहे.