“संजय राऊत माझ्या मतदारसंघातून लढून दाखवा”, शिवसेनेच्या नेत्याचं चॅलेंज

| Updated on: Jun 26, 2023 | 4:22 PM

ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी काल शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर सडकून टीका केली. शंभूराज देसाई हे फेक नेते आहेत. गद्दारांचा भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण असून हा 2024 ला खोडून काढू, अशी टीका त्यांनी यावेळी केली. याच टीकेला देसाई यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

सातारा : ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी काल शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर सडकून टीका केली. शंभूराज देसाई हे फेक नेते आहेत. गद्दारांचा भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण असून हा 2024 ला खोडून काढू, अशी टीका त्यांनी यावेळी केली. याच टीकेला देसाई यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येवून रहावे आणि माझ्याविरोधात उभे राहून दाखवावे, त्यांच्या जेवण खाण्याची सगळी व्यवस्था मी करतो. माझ्या मतदारसंघातील सामान्य जनता त्यांना दूध का दूध पानी का पानी करून दाखवतील, अशी खोचक टीका देसाई यांनी केली आहे.

Published on: Jun 26, 2023 04:22 PM
“15 दिवसांत पाणी प्रश्व सोडवा अन्यथा…”, ठाकरे गटाचा राज्य सरकारल इशारा
‘बीआरएस म्हणजे नवा एमएमआय…, नियतमध्येच खोट’; केसीआर यांच्या माऊलींच्या दर्शनावरून राऊत यांची टीका