Video : …म्हणून संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर आरोप केले; शंभूराज देसाई बरसले…

| Updated on: Feb 22, 2023 | 2:54 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्याला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. पाहा...

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.त्याला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे. संजय राऊतांनी केलेला वक्तव्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले की संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून गांभीर्याकडे पाहत नाही. यातून स्वत:ला नाहक महत्त्व प्राप्त करून घेण्यासाठी संजय राऊत यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या विधानावरून संजय राऊत यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल”, असंही शंभूराज देसाई म्हणालेत. “संजय राऊतांना स्वतःची सुरक्षा वाढवून घ्यायची होती. म्हणून अशाप्रकारे मोठ्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. अशा मोठ्या व्यक्तीचं नाव घेतलं की सुरक्षा वाढेल म्हणून त्यांनी हे विधान केलंय”, असंही देसाई म्हणालेत.

Published on: Feb 22, 2023 02:52 PM
भगतसिंग कोश्यारी यांच्या जाण्याने सर्वात जास्त मी संतुष्ट- शरद पवार
50 खोके घेणाऱ्यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करू नये; राजू शेट्टी यांचं कुणावर टीकास्त्र?