आज भाऊ असते तर…; लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप भावूक
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. यात अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. या मतमोजणीवर लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
पिंपरी-चिंचवड : भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जे कामं केलं, त्याचा परिणाम दिसत आहे. लोकांनी लक्ष्मण जगताप यांचं काम लोकांनी पाहिलं आहे. त्यामुळे लोकांना विश्वास आहे. लोकांचा हाच विश्वास मतांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज लक्ष्मणभाऊ आज असते तर आम्ही मतमोजणी केंद्रावर असलो असतो, असं शंकर जगताप म्हणाले आहेत. लोकांची कामं लक्ष्मण जगताप यांनी केलीत. लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे निकालाआधीच विजयाचे बॅनर लागले. हे बॅनर्स म्हणजे भाऊंच्या कामाची पावती आहे, असंही शंकर जगताप म्हणालेत.