“भाजपने किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढावी, त्याच्या जीवावर…”, ठाकरे गटाच्या नेत्याची सडकून टीका

| Updated on: Jul 19, 2023 | 11:52 AM

भाजप नेते किरीट सोमय्यांचा हा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातल्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्या या व्हिडीओवरून ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर, 19 जुलै 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा हा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातल्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्या या व्हिडीओवरून ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सोमय्याला दिलेली सुरक्षा काढून घ्या, सुरक्षेच्या जीवावरच सोमय्या अश्लील चाळे करतोय. भाजपाच्या बोबड्या, नागड्या किरीट सोमय्या याने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू – फुले यांच्या महाराष्ट्राला काळीमा फसलाय.भाजपकडे लाज शिल्लक असेल तर त्याला ढुंगणावर लाथ घालून पदावरून आणि महाराष्ट्रातून हाकलून दिले पाहिजे. सोमय्यामुळे भाजपची महाराष्ट्रात लाजलज्जा शिल्लक राहिली नाही. भाजपवाल्यानी डोळे उघडून बघावे आणि सोमय्याची सुरक्षा काढून घ्यावी.”

Published on: Jul 19, 2023 08:44 AM
‘…अब की बार फिर एक बार मोदी सरकार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, विरोधकांवर सडकून टीका
सोनिया गांधी व राहुल गांधी यांना अचानक भोपळ विमानतळावर उतवण्यात आलं? नेमकं कारण काय?