“नितेश राणे म्हणजे सडलेला कांदा”, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची टीका
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटल्यावर राजकारण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी "आदित्य ठाकरे हे ठाकरे नावावर कलंक आहे, असं म्हणाले. यावर आता ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी पलटवार केला आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटल्यावर राजकारण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी “आदित्य ठाकरे हे ठाकरे नावावर कलंक आहे, असं म्हणाले. यावर आता ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, “नारायण राणेंचं बावचाळलेलं पोरगं म्हणजे नितेश राणे. तुम्ही म्हणता आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबाला कलंक आहेत. अहो नितेश राणे आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भविष्य आहे. महाराष्ट्राचे कर्तृत्वान युवा आहेत. नितेश राणे तुम्हाला लाज वाटते का? तुम्ही मातोश्रीच्या बाहेर येऊन दाखवा शिवसैनिक तुमचे दोन्ही पाय तोडतील. नितेश राणे हा नास्का कांदा आहे.”
Published on: Jul 12, 2023 09:33 AM