“2024 ला जनता शिंदे सरकारवर बुलडोझर फिरवणार”, ठाकरे गटाची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 23, 2023 | 9:45 AM

गुरुवारी मुंबईतील वांद्रे परिसरातील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. या कारवाईवर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर : गुरुवारी मुंबईतील वांद्रे परिसरातील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. या कारवाईवर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिंदे आणि भाजप सरकारने कितीही कारवाई केल्या तरी 2024 ला जनता त्यांच्यावर बुलडोझर फिरवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना आणि भाजपाच्या अनेक मंत्री, नेत्यांचे अनधिकृत बांधकामे आहेत. 2024 ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिंदे-भाजप नेत्यांच्या अनधिकृत जागांवर बुलडोजर फिरवण्याचा आराखडा आम्ही तयार केला आहे. तसेच शाखांवर कारवाई झाल्याने शिवसैनिकांचे खच्चीकरण होणार नाही,” असं शरद कोळी म्हणाले.

Published on: Jun 23, 2023 09:45 AM
“…तर उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या दर्शनासाठी कधी जाणार?”, मुंबईतील बॅनरबाजीवरून भाजप नेत्याची टीका
“…तर संजय राऊत यांनी तक्रार करावी”, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील आरोपांवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया