शरद पवार यांचा पत्रकारांना सल्ला, एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, “तुम्ही काहीही विचार पण ‘हा’ शब्द मागे घ्या”!
कुलगुरू राम ताकवले यांच्या शोक सभेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक विषयांवर उत्तरं दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानपदासाठी ते दावेदार असल्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.
पुणे : कुलगुरू राम ताकवले यांच्या शोक सभेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक विषयांवर उत्तरं दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानपदासाठी ते दावेदार असल्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, अशी माहिती स्वत:शरद पवार यांनी दिली आहे. यावेळी पंतप्रधान पदाच्या दावेदारीबाबत उत्तर देण्यापूर्वी त्यांनी माझ्या वयानुसार असा शब्द कधी माझ्यासाठी वापरू नका, असा सूचक सल्ला देखील पत्रकारांना दिला. त्यांच्या या उत्तरानंतर पत्रकार परिषदमध्ये एकच हशा पिकला.
Published on: May 23, 2023 10:40 AM