‘सामनात काय लिहलं? मी काय सांगतोय… ते’; शरद पवार यांनी मविआबाबत केली आपली भूमिका स्पष्ट
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात इकडे तिकडे चर्चा सुरू झाल्या तर यावरून महाविकास आघाडितील घटक पक्षात देखील चलबिचल सुरू झाली. यावरून उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात बैठक पार पडली. यातूनच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
पुणे | 14 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यात एक गुप्त बैठक पार पडली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या तर यावरून महाविकास आघाडितील घटकपक्षात देखील चलबिचल सुरू झाली. उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात एक बैठक पार पडली. यातूनच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. बारामती येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजपशी सबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध असण्याचे कारण नाही असे स्पष्ट केलं आहे. तर सामनातील अग्रलेखाच्या टीकेला उत्तर देताना, कोणी काहीही लिहू द्या पण येथे मी बोलतोय. त्याला काही महत्व आहे की नाही असा सवाल उपस्थित केला.