Special Report | शरद पवार यांच्या भेटीला अजित पवार; चर्चा मात्र त्यांच्या गाडीतून प्रवासाची? एका प्रश्नाची?

| Updated on: Aug 14, 2023 | 7:32 AM

याभेटीमुळे सध्या सोशल मिडीयासह राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तर ही भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच घडवून आणल्याचेही बोलले जात आहे. मात्र ही भेट इतकी गुपीत होती. की त्याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता.

मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये एका उद्योगपतीच्या घरात भेट घेतली. याभेटीमुळे सध्या सोशल मिडीयासह राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तर ही भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच घडवून आणल्याचेही बोलले जात आहे. मात्र ही भेट इतकी गुपीत होती. की त्याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. मात्र अजित पवार यांचा गाडीने घात केला. ज्या गाडीत अजित पवार आले होते. ते त्या गाडीतून त जाता दुसऱ्या गाडीतून बाहेर पडले आणि गाडी गेटला धडकली आणि अजित पवार हे मिडीयाला दिसले. फक्त दिसलेच नाही तर गे स्वत: ला लपवण्यासाठी चक्क गाडीत झोपले. यामुळे सध्या दादांची लपवाछपवी का? असा सवाल केला जात असून त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 14, 2023 07:32 AM
thane Hospital Patient Death : ठाण्याच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव, 17 रुग्णांचा मृतू; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले कोणते संकेत?
Special Report : फॉर्म्युला ठरला?; भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती महामंडळं?