पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहत शरद पवार यांचे ‘ते’ सूचक विधान

| Updated on: Aug 01, 2023 | 2:04 PM

देशाच्या राजकारणातील दोन विरोधी नेते आज एका मंचावर दिसले.राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि इंडियाच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र आले. यामुळे त्यांच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी शरद पवार यांनी जोरदार भाषण केलं.

पुणे, 01 ऑगस्ट 2023 | देशाच्या राजकारणातील दोन विरोधी नेते आज एका मंचावर दिसले.राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि इंडियाच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र आले. यामुळे त्यांच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी शरद पवार यांनी जोरदार भाषण केलं. ते म्हणाले की, केसरी आणि मराठाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांना घाम फोडला होता. गणेशोत्सव, शिवजयंती यामध्ये टिळक यांच मोठ योगदान आहे. अलिकडच्या काळात या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. परंतु देशातील पहिली सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांच्या काळात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे कापली होती, असे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मोदी यांच्या कामगिरीचे कौतूक केले.

 

Published on: Aug 01, 2023 02:04 PM
‘त्या काळात लोकमान्य टिळक आणि आता पंतप्रधान मोदी हे सामन्य माणसाच्या मनातील भावना ओळखणारे नेते’: शिंदे
‘इंग्रजांनाही टिळकांनी खडसावलं, त्यांच्या भारताबद्दलच्या ‘त्या’ धारणेलाही तोडलं’: पंतप्रधान मोदी