Sharad Pawar : मोठी बातमी, संजय राऊतांवरील कारवाईवर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं
संजय राऊतांना साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली. यावर शिवसेनेकडून टीखट प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिलाय.
मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut Ed Inquiry) यांना एका चाळीच्या पुनर्विकासात आर्थिक अफरातफर झाल्याच्या आरोपांखाली काल त्यांची 9 तास चौकशी झाली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या झालेल्या या चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली. यावर शिवसेनेकडून टीखट प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिला आहे. यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या राजकीय वर्तुळात राऊत चर्चेत्या केंद्रस्थानी आहे. या सगळ्या घडामोडींनंतर सामनाचा अग्रलेख (Saamana Editorial) कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. तर दुसरीकडे खासदार अनिल देसाई यांनी देखील केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याची टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय.