गेलेल आले, भेट घेतली, मागणी ही केली, मात्र पवार यांनी थेट दंडच थोपटले, मौन सोडत म्हणाले, ‘आपल्याला संघर्ष’
शरद पवारांच्या पाया पडत आम्ही आशीर्वाद मागितले. आम्हा सगळ्यांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. पण राष्ट्रवादी एकसंघ कसा राहील याच्यासाठीही त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आमची मंत. विचार, विनंती ऐकून घेतली" अशी माहिती प्रफुल पटेल यांनी सांगितली.
मुंबई, 17 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांचा गट शरद पवार यांना भेटायला गेला होता. यामध्ये स्वत: अजित पवार यांच्यासह महत्वाचे नेते आणि नकताच मंत्री झालेले नेते होते. यावेळी, शरद पवारांच्या पाया पडत आम्ही आशीर्वाद मागितले. आम्हा सगळ्यांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. पण राष्ट्रवादी एकसंघ कसा राहील याच्यासाठीही त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आमची मंत. विचार, विनंती ऐकून घेतली” अशी माहिती प्रफुल पटेल यांनी सांगितली. त्यानंतर पवारांनी मौन बाळगलं होतं. मात्र आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, अजित पवार गटाचा प्रस्ताव फेटाळला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, पुरोगामी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मला भाजपसोबत जायचं नसून आपल्याला संघर्ष करायरचयं असे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार हे अजित पवार गटाच्या विनंतीचा विचारपुर्वक निर्णय घेतील असं अनेकांना वाटणारा आशावाद फोल ठरला आहे.