Sharad Pawar : मुख्यमंत्रीपद मिळेल याची कल्पना एकनाथ शिंदेंनाही नसावी : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपद मिळेल याची पवारांनाही कल्पाना नसावी, असंही पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्यात. त्यावेळी पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकार टिकवण्यात उद्धव ठाकरे, तुम्ही कमी पडलात का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, ‘आम्ही कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. त्याचा मूळ इफेक्ट. 38 आमदार बाहेर जातात, ही काही साधी गोष्ट नाही. ती नेण्यासाठी कुवत शिंदेंनी दाखवली. त्यातच त्यांचं यश आहे’, असं पवार म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपद मिळेल याची पवारांनाही कल्पाना नसावी, असंही पवार यावेळी म्हणाले.
Published on: Jun 30, 2022 11:29 PM