“धिक्कार असो धिक्कार असो!”, भरत गोगावले यांच्या ‘त्या’ विधानानंतर शरद पवार गट आक्रमक

| Updated on: Jul 13, 2023 | 10:17 AM

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या रस्सीखेच पाहायला मिळतेय. पालकमंत्रिपदावर दावा करताना भरत गोगावले यांची आदिती तटकरे यांचा उल्लेख करत जीभ घसरली. भरत गोगावले यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर आदिती तटकरे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आंदोलन केलं आहे.

मुंबई : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या रस्सीखेच पाहायला मिळतेय. पालकमंत्रिपदावर दावा करताना भरत गोगावले यांची आदिती तटकरे यांचा उल्लेख करत जीभ घसरली. “आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं तरी मी त्याच्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही?,” असं वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंतर आदिती तटकरे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आंदोलन केलं आहे. यावेळी भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केलं. यावेळी विद्या चव्हाण म्हणाल्या की, “भरत गोगावले यांच्या विधानाचा धिक्कार करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.”

Published on: Jul 13, 2023 10:17 AM
अखेर मुहूर्त लागला! अजित पवार यांचा दिल्ली दौरा झाला आणि एका रात्रीत मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल
इगतपुरीतस मुसळधार पाऊस; भावलीतील मुख्य धबधबा ही झाला प्रवाहित