Sharad Pawar | मी फक्त अजित पवार काय बोलले ते पाहिलं, त्यामुळे मी त्याबद्दल उल्लेख केला; आव्हाडांच मला माहित नाही
आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हताच असे म्हंटलं होतं. त्याच्यावरही सध्या राजकारण तापलेलं आहे. यावर पवार यांना विचारलं असता “जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते मी पाहिलं नाही. अजित पवार काय बोलले ते मी पाहिलं. त्यामुळे मी त्याबद्दल उल्लेख केला”, असं शरद पवारानी स्पष्ट केलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावर मोठा गदारोळ झाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली. तसेच यावेळी त्यांना पत्रकारांनी जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी आपण त्यांच वक्तव्य ऐकलं नाही असे म्हटलं आहे.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना, ते धर्मवीर नाहीत तर स्वराज्य रक्षक आहेत असे म्हटलं होतं. त्यानंतर आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हताच असे म्हंटलं होतं. त्याच्यावरही सध्या राजकारण तापलेलं आहे. यावर पवार यांना विचारलं असता “जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते मी पाहिलं नाही. अजित पवार काय बोलले ते मी पाहिलं. त्यामुळे मी त्याबद्दल उल्लेख केला”, असं शरद पवारानी स्पष्ट केलं आहे.
मात्र आव्हाड यांनी माध्यमांनी आपलं प्रतिक्रीया तोडून मोडून दाखवल्याचं म्हटलं आहे. तर आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगताना, औरंगजेब हा क्रूर होता त्याने आईला मारलं, बापाला मारलं पण त्याच्यासमोर महाराष्ट्र झुकला नाही. तर शिवाजी महाराज झुकले नाहीत की संभाजी महाराज असे म्हटल्याचे त्यांनी सांगितलं.