‘मारकडवाडीत शरद पवार माझे काम…,’ काय म्हणाले राम सातपुते
सोलापूरच्या माळशिरस मतदार संघातील मारकडवाडी या गावात ईव्हीएमच्या विरोधात बॅलेटवर निवडणूकांचा प्रयोग ग्रामकऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता.शरद पवार यांच्या गटाचे वर्चस्व असलेल्या या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा विजय झाला. मात्र या गावात कमी मतदान झाल्याने बॅलेटवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न सरकारने हाणून पाडला.
मारकडवाडीत ईव्हीएम विरोधात बॅलट पेपर अशा ग्रामस्थांचा संघर्ष संपूर्ण देशात चर्तेत आहे. या गावातून गेल्या तीन निवडणूका महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांना लीड मिळाले होते. परंतू यंदा निवडणूकीत तसे झाले नाही. जानकर यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विजय सिंह मोहीते पाटील हे यंदा जानकर यांच्या सोबत होते. जानकर विजय झाले परंतू या गावातून त्यांना ८० टक्के मतदान होणे अपेक्षित असताना तसे घडले नाही. मारकडवाडी गावात महादेव जानकर हे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यापेक्षा मागे होते. त्यामुळे ग्रामस्थांनी अभिरुप न्यायालयाप्रमाण बॅलेटवर अभिरुप निवडणूक राबविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू प्रशासनाने पोलिस फोर्स लावून गावकऱ्यांना रोखले. त्यामुळे उद्या राहुल गांधी आणि शरद पवार या ग्रामस्थांना भेट देणार आहेत. दरम्यान, या मारकडवाडी गावात देवेंद्र फडणवीस आणि राम सातपुते यांचे बॅनर लावण्यात आले आहे.