फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात शरद पवार यांची तोफ धडाडणार; ‘येथून’ रणशिंग फुंकणार

| Updated on: Aug 08, 2023 | 12:36 PM

पण त्यांनी आता पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. याचअनुशंगाने पवार यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याच्या आधीच फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

पुणे, 8 ऑगस्ट 2023 । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे काहिच उरलेलं नाही. पण त्यांनी आता पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. याचअनुशंगाने पवार यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याच्या आधीच फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे त्यांनी नाशिक येथे जाऊन छगन भूजबळ यांचा मतदारसंघ असणाऱ्या येवल्यात सभा घेतली होती. त्यानंतर पावसामुळे सभा आणि दौरे थांबवले होते. जे आता पुन्हा सुरू होत आहेत. यावेळी शरद पवार यांनी १७ ऑगस्ट ही तारिख फिक्स केली असून ते अजित पवार यांच्या बालेकिल्ल्याला धडक देणार आहेत. याचदरम्यान अजित पवार यांनी पुण्यात आले विषेश लक्ष देत असतानाच आता पवार यांनी पुणे जिल्ह्यात रणनीती आखण्याची तयारी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांची चिंता वाढली आहे.

Published on: Aug 08, 2023 12:36 PM
“INDIA नव्हे तर घमंडिया…”; विरोधकांच्या आघाडीचं नामकरण करत पंतप्रधान मोदी यांची टीका
‘हरकत नाही, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाग…’, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका