“माझ्या माघारीनंतर शपथविधी का घेतला?”, देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 29, 2023 | 6:35 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस यांच्या दाव्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी दोन दिवसांत धोरण बदललं तर दोन दिवसांनी चोरुन पहाटे शपथविधी का घेतला?..." नेमकं शरद पवार काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ...

पुणे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्यासोबत डबल गेम केला. राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येणार होती. पण शरद पवार चार दिवस आधी मागे फिरले,” असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. फडणवीस यांच्या दाव्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी दोन दिवसांत धोरण बदललं तर दोन दिवसांनी चोरुन पहाटे शपथविधी का घेतला?” नेमकं शरद पवार काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

“माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने 3 वेळा निवडून आली”, शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता कशी आली? शरद पवार म्हणतात, “भाजप ही राज्य…”