शरद पवार यांनी केली भाजप, अजितदादा गटाची कोंडी, अशी खेळली मोठी खेळी

| Updated on: Sep 05, 2023 | 11:12 PM

राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी जळगाव जिल्ह्यात तसं चित्र नाहीय.. अमळनेरचे आमदार अनिल पाटील वगळता इतर बडे नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडलेली नसल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय., यावेळी बी.एस.पाटील, मनसेकडून चोपड्यात विधानसभेचे उमेदवार राहिलेले चंद्रकांत बारेला यांच्यासह इतरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.....

जळगाव : 05 सप्टेंबर 2023 | जळगावमध्ये राष्ट्रवादीची पहिली सभा झाली. पक्ष फुटीनंतरची ही पहिलीच सभा. याच सभेत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भांडाफोड केला. जळगाव या भाजपच्या बालेकिल्लाला मात्र आता खडसे यांनी आव्हान दिलेय. तर, एकनाथ खडसे लोकसभेच्या रिंगणात उतरणार का, याची चर्चा सुरु झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर सभेत लोकसभेच शिवधनुष्य उचलायला हवं असे आवाहन खडसे यांना केलंय. त्यामुळे यंदा एकनाथ खडसे लोकसभेसाठी उभे राहणार का असा प्रश्न आहे. तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार बी.एस. पाटील यांना प्रवेश देत राष्ट्रवादीने भाजपला सुरुंग लावलाय. अमळनेरचे बी. एस. पाटील राष्ट्रवादीत आल्यामुळे अजित पवार गटासोबतच अजितदादांचे जवळचे सहकारी मंत्री अनिल पाटील यांचीही शरद पवार यांनी कोंडी केली. जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव असे दोन लोकसभेचे मतदारसंघ आहेत. त्यापैकी खडसे यांच्या सून रावेरमधून भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे खडसे जर रावेरमधून लढले तर रक्षा खडसेही राष्ट्रवादीत येणार का अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. गेली अनेक निवडणुका रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभांवर भाजपचं वर्चस्व आहे. मात्र इथल्या अनेक भागांमध्ये एकनाथ खडसेंचाही प्रभाव चांगला आहे, त्यामुळे खडसेंना लोकसभेचा प्रस्ताव देऊन राष्ट्रवादीनं आव्हान देण्याची तयारी सुरु केलीय. पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Sep 05, 2023 11:12 PM
कोटा न वाढवता OBC तून मराठा आरक्षणाला विरोध! नेमकं प्रकरण काय? पाहा स्पेशल रिपोर्ट
पुण्यातील PMPML चे ‘हे’ ८ मार्ग उद्या राहणार बंद, प्रशासनानं का घेतला निर्णय?