फडणवीसांच्या स्टिंग बॉम्बमधले मोठे साहेब कोण? शरद पवारांनीच स्पष्टीकरण
मोठे साहेब म्हणून एका मोठ्या नेत्याचं नावही घेत होता. हे मोठे साहेब कोण? हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी स्पष्ट केलं.
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल विधानसभे भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांच्या कटाविरोधातील सरकारी वकिलाच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला. फडणवीस विधानसभेत केवळ आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी याबाबतचे पुरावेच विधानसभा अध्यक्षांकडे दिले. फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन त्यात व्हिडीओ पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं. महाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी सरकारी वकील षडयंत्रं रचत होता. संबंधित व्यक्तींशी संवाद साधत होता. त्यावेळी मोठे साहेब म्हणून एका मोठ्या नेत्याचं नावही घेत होता. हे मोठे साहेब कोण? हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी स्पष्ट केलं. या व्हिडीओमध्ये मोठे साहेब म्हणून माझा उल्लेख केला आहे. पण या प्रकरणाशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.