देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता कशी आली? शरद पवार म्हणतात, “भाजप ही राज्य…”

| Updated on: Jun 29, 2023 | 10:30 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे. यावेळी शरद पवार यांनी भाजपने काही राज्यात आपली सत्ता कशी आणली यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, एका वर्षात देशाच्या लोकसभेच्या निवडणुका येतील. त्याआधी काही राज्यांच्या निवडणुका आहे. पण...

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे. यावेळी शरद पवार यांनी भाजपने काही राज्यात आपली सत्ता कशी आणली यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “एका वर्षात देशाच्या लोकसभेच्या निवडणुका येतील. त्याआधी काही राज्यांच्या निवडणुका आहे. पण कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये आपण पाहिलं. भाजप पक्ष यांचा लोकमताचा पाठिंबा राज्य पातळीवर काय आहे हे पाहण्याची गरज आहे. त्यामध्ये तुम्ही देशाचा नकाशा तुमच्यासमोर ठेवा. अनेक राज्यांमध्ये भाजपचं राज्य नाही. गोवामध्ये काँग्रेसचं बहुमत होतं. त्यांची सत्ता होती. पण त्यांचे काही आमदार फोडले आणि ते भाजपात गेले. त्यामुळे तिथे सत्ता आली. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथांच्या नेतृत्वात सरकार होतं. पण तिथले काही आमदार फोडले आणि त्याठिकाणी राज्य आणलं. महाराष्ट्रात काय केलं ते मी वेगळं सांगत नाही. याचा अर्थ असा आहे, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम आणि मणिपूर. मणिपूर गेल्या ४५ दिवसांपासून वाईट अवस्था आहे. हे सगळं राज्यांची परिस्थिती हेच सांगतेय की, भाजप ही राज्य सांभाळू शकत नाही. त्यामुळे उद्या निवडणुकांचा निर्णय काय होईल. याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधानांनी अशोभनीय वक्तव्य केलं.”

Published on: Jun 29, 2023 07:00 PM
“माझ्या माघारीनंतर शपथविधी का घेतला?”, देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांची प्रतिक्रिया
एका हाकेचे अंतर गाठण्यासाठी त्यांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास