“मी, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल”, शरद पवारांचं सूचक विधान

| Updated on: Jul 31, 2023 | 8:01 AM

वाय बी. चव्हाण सेंटरला पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. सहा ऐतिहासिक ग्रंथांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

मुंबई, 31 जुलै 2023 | वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्यावतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सहा ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, “राज्य सरकारशी बोलणं सध्या जरा अडचणीचं आहे. पण, त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघाला की, राज्य सरकारला मदत करणं भाग पडेल. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मीसुद्धा आहे. आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये बदल होईल. हे विशेष वेगळं सांगायची गरज नाही.”

Published on: Jul 31, 2023 08:01 AM
‘कुठलं थोबाड, कुठलं सौंदर्य दाखवलं होतं?’ ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाट यांच्या त्या वक्तव्यावर घणाघात
विकेन्डला अशोका धबधब्यावर ‘ओव्हरफ्लो’ गर्दी, प्रशासनाच्या ‘त्या’ निर्णयानं हौशी पर्यटकांचा हिरमोड