लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की बहिणीची अब्रु….

| Updated on: Sep 15, 2024 | 2:25 PM

सत्तेचा माज या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात शिरला आहे.सर्वत्र सत्तेचा गैरवापर सुरु आहे. लोकशाहीने मतदानाचा अधिकार आपणास दिला आहे.त्यांना आता खड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

Follow us on

भारतात पूर्वी की गहू आयात करावा लागयचा. आता गहू निर्यात करणारा देश आहे. दहा वर्षांचा शेती खात्यात जे आपण काम केले त्याचे आणि तुम्हा शेतकऱ्याचे हे यश असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.धुळ्यातील शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की जगामध्ये एक नंबरचा तांदूळ पिकविणारा देश झाला आहे. शेतकऱ्यांवर 71 हजार कोटीचे कर्ज होते. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत होता. त्यामुळे काही तरी कमी आहे. म्हणून मी स्वत:यवतमाळ गेलो. त्या शेतकऱ्याने सावकरांकडून कर्ज घेतले होते. नंतर आपण दिल्लीत परत गेलो आणि मंत्री मंत्रीमंडळात आग्रह केला आणि 71 हजार कोटीचे कर्ज मुक्त केले. जे कर्ज वेळेवर फेडतात त्यांना 14 टक्के असलेला व्याज दर सहा टक्के ते चार टक्क्यांवर आणला, शेतीमालाला भाव दिल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी यावेळी म्हटले. शरद पवार पुढे म्हणाले, आता गुंडाचे राज्य सुरु आहे. सत्तेचा गैरवापर सुरु आहे. ना कारखाने, ना सहकार चळवळीसाठी या सरकारने काम केले. ना रोजगार दिला नाही.गेल्या काही वर्षांत काहीच विकास झाला नाही. काही करता आले नाही म्हणून हे सरकार बहिणींना 1500 हजार रुपये देणार आहे. पण खरी गरज बहिणींची अब्रू वाचविण्याची आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे सरकारचे लक्ष नाही, असा जोरदार टोला शरद पवार यांनी महायुती सरकारला लगावला आहे.