शरद पवार कुसुमविषयी सांगतात तेव्हा…..

| Updated on: Jun 04, 2022 | 8:57 PM

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली त्यावेळी राजकारणातील जडण घडण आणि मिळालेल्या अनुभवांच्या आठवणी शरद पवार यांनी सांगितल्या. त्या सांगताना त्यांनी सांगितले की, मला लहान वयातच यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांची राजकारणाची पद्धत, त्यांचा लोकसंग्रह, कार्यकर्ते आणि अनेक कार्यकर्त्यांची नावं लक्षात ठेवण्याची […]

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली त्यावेळी राजकारणातील जडण घडण आणि मिळालेल्या अनुभवांच्या आठवणी शरद पवार यांनी सांगितल्या. त्या सांगताना त्यांनी सांगितले की, मला लहान वयातच यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांची राजकारणाची पद्धत, त्यांचा लोकसंग्रह, कार्यकर्ते आणि अनेक कार्यकर्त्यांची नावं लक्षात ठेवण्याची त्यांची लकब मला आत्मसाथ करता आली. मुख्यमंत्री झाल्यावर शरद पवार यांना भेटण्यासाठी गावाकडून एक महिला मंत्रालयात आलेली असते. ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आल्यावर तिला बसायला सांगतात, त्यावेळी शरद पवार तिला विचारतात काय कुसुम काय करते, त्यावेळी ती महिला ज्या कामासाठी आलेली असते ते कामच ती विसरते कारण शरद पवार यांनी तिला नावाने हाक मारलेली असते.

Published on: Jun 04, 2022 08:57 PM
मान्सून राज्यात उशिर करणार
Special Report | 13 अपक्ष, 13 छोटे पक्ष नेमके कोणासोबत? -tv9